कर बचतही आणि चांगला परतावाही; जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेबाबत – ABP Majha

B

सध्या अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर बहुतांश मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवी आणि बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे.
मात्र तरीही लोकांना चांगला परतावा मिळत नाही. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना ठरू शकते.
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत (Post Office Term Deposit Scheme) ग्राहकांना चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही या योजनेत एक, दोन, तीन आणि 5 वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या सर्व कार्यकाळात तुम्हाला चांगल्या व्याजदरासह परतावा दिले जातो.
पोस्ट ऑफिसच्या Post Office Term Deposit Scheme तुम्हाला एक ते तीन वर्षासाठीच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज दर मिळतो. तर, पाच वर्षापर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 6.7 टक्के व्याजदर मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. मात्र, 10 वर्षावरील मुलांच्या नावे खाते सुरू करता येऊ शकते. हे खाते पालकांच्या संमतीने आणि देखरेखीत सुरू करता येईल. तुम्ही या योजनेत किमान एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह हे खाते सुरू करू शकता. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर खात्याच्या (Income Tax Rebate) 80C नुसार कर सवलत मिळू शकते. या गुंतवणूक योजनेनुसार तुम्हाला 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. त्याशिवाय तुम्ही एकहून अधिक टर्म डिपॉझिट अकाउंट सुरू करू शकता.
या योजनेत तुम्ही खाते सुरू केल्यानंतर किमान सहा महिने पैसे काढू शकत नाही. त्यानंतर एक वर्षाच्या आत तुम्ही मुदत ठेवीतील गुंतवणूक काढून घेतल्यास एकूण जमा रक्कमेपैकी दोन टक्के रक्कम कापली जाते.
पीएफमधून पैसे काढायचे आहेत, घरबसल्या अॅपने काढता येईल रक्कम
Demat Accounts: शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदार वाढले; डिमॅट अकाउंटची संख्या 10 कोटींवर
Photo : गुंतवणुकीसाठी आलेली चीनची कंपनी औरंगाबादचे खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून परतली
Adani: अदानी समूहाच्या ‘या’ कंपनीचा निफ्टी 50 मध्ये समावेश
Credit Card Tips: क्रेडिट कार्ड मोठ्या फायद्याचे, जाणून घ्या कसं?
Yakub Memon : याकूबच्या कबरीबाबत मोठी बातमी! टायगर मेमनच्या धमकीनंतर कबरीची सजावट?
Elizabeth II : भारताशी खास नातं; महाराणी एलिझाबेथ यांचा तीन वेळेस भारत दौरा
दोन वर्षापूर्वीची चूक SBI ला महागात पडली; अंक ओळखीत गोंधळ केल्याने द्यावी लागणार नुकसानभरपाई
Share Market Opening : शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सने गाठला 60 हजारांचा टप्पा
Queen Elizabeth II Visited India : सात दशकात तीन वेळेस भारत दौरा; पाहा राणी एलिझाबेथ यांचे फोटो

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  How To Apply Axis Bank Personal Loan
  February 27, 2021
  Save
  How To Apply Axis Bank Personal Loan
  H
  Hemant Malhotra
  How To Qualify For A Personal Loan (Without Putting Up Security).
  April 9, 2021
  Save
  How To Qualify For A Personal Loan (Without Putting Up Security).
  H
  Hemant Malhotra
  Exactly how to create your SBI Green PIN in seconds: Inspect step-by-step procedure
  January 1, 2021
  Save
  Exactly how to create your SBI Green PIN in seconds: Inspect step-by-step procedure
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.