'टॉप अप लोन' काय असते, याचा काय फायदा असतो, जाणून घ्या! – Times Now Marathi

B

नवी दिल्ली: अनेकवेळा एक कर्ज घेतल्यानंतरदेखील आर्थिक गरज भागत नाही किंवा एक कर्ज ( Loan)पुरेसे ठरत नाही. अशावेळी दुसरे कर्ज घ्यावे लागते. आधीपासून सुरू असलेल्या कर्जानंतर आणखी काही रकमेचे कर्ज घेण्यास टॉप अप लोन (Top up Loan)असे म्हणतात. ज्या ग्राहकांची क्रेडिट हिस्ट्री (Credit history) चांगली असते अशा ग्राहकांना बॅंका (Bank) किंवा वित्तीय कंपन्या चांगल्या म्हणजे स्वस्त व्याजदराने कर्ज देतात. आर्थिक संकटाच्या वेळी सोने (Gold) किंवा इतर मालमत्ता (Property) विकण्यापेक्षा किंवा तारण ठेवण्यापेक्षा टॉप अप लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (What is Top up Loan, check the benefits & details)
अर्थात ग्राहक टॉप अप लोनसाठी तेव्हाच पात्र ठरतो तर तो किमान एक वर्षापासून नियमितपणे आपल्या आधीच्या कर्जाच्या ईएमआय भरत असेल. ग्राहकांची क्रेडिट हिस्ट्री (Credit history) आणि रिपेमेंट हिस्ट्री (Repayment history)हे एक प्रमुख घटक आहेत. हे घटक ठरवतात की त्यांना टॉप अप लोन मिळणार की नाही. टॉप अप लोन सर्वसाधारणपणे आधीच्या मूळ कर्जासाठी असणाऱ्या अटी, व्याजदर इत्यादीप्रमाणेच दिले जाते. जाणकार सांगतात की होम लोनच्या (Home Loan)परिस्थितीत सर्वसाधारणपणे बॅंक घराच्या किंमतीच्या ७० ते ८० टक्के कर्ज देतात. मात्र अनेक लोक पूर्ण कर्ज घेत नाहीत. त्यामुळे या उरलेल्या रकमेला भविष्यात टॉप अप लोनच्या स्वरुपात घेता येते. याशिवाय ग्राहकाला कर्जाची परतफेड करण्यात आलेल्या रकमेएवढेदेखील टॉप अप लोन मिळते.
घराच्या एखाद्या भागाची डागडुजी किंवा घराचे नुतनीकरण यासाठीदेखील तुम्ही जुन्या होम लोनवर टॉप अप लोन घेऊ शकता. टॉप अप लोनचे व्याजदर पर्सनल लोनपेक्षा फारच कमी असतात. शिवाय टॉप अप लोन चटकन देखील मिळते. टॉप अप लोन हे मूळ कर्जावर घेतलेले अतिरक्त कर्ज असल्याने त्यासाठी तारण आधीच असते. त्यामुळे पर्सनल लोनच्या तुलनेत कर्जाची रक्कम जास्त मिळते, कर्जाचा कालावधी जास्त मिळतो आणि व्याजदरदेखील कमी असतात.
या प्रकारच्या कर्जाचा सर्वात मोठा फायदा हा असतो की ग्राहकाला अतिरिक्त कागदपत्रांच्या प्रक्रियेची आवश्यकता नसते. कारण बॅंकेकडे किंवा संबंधित वित्तीय कंपनीकडे तुम्ही आधीच घेतलेल्या कर्जाच्या अनुषंगाने केवायसी कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे असतात. बहुतांश सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बॅंका होम लोनवर टॉप अप लोनची सुविधा देतात. टॉप अप लोनसाठी अर्ज करणेदेखील खूपच सोपे असते. टॉप अप लोनसाठी ऑनलाइनदेखील अर्ज करता येतो. शिवाय टॉप अप लोनसाठी प्रोसेसिंग फीदेखील फारच कमी असते. 
कोरोना महामारीच्या संकटात अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे. अशावेळी कर्जाची आवश्यकता असल्यास टॉप अप लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  Raising a CIBIL Dispute: Types, Status & Process of CIBIL Dispute Resolution
  December 27, 2020
  Save
  Raising a CIBIL Dispute: Types, Status & Process of CIBIL Dispute Resolution
  H
  Hemant Malhotra
  how to terminate or stop ECS NACH mandate?
  December 22, 2020
  Save
  how to terminate or stop ECS NACH mandate?
  H
  Hemant Malhotra
  Cost of Capital: How Businessmen and Investors utilize it to examine investments?
  December 28, 2020
  Save
  Cost of Capital: How Businessmen and Investors utilize it to examine investments?
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.