पहिल्यांदा Persoanl Loan घेताय! लक्षात ठेवा पाच गोष्टी – Sakal

B

बोलून बातमी शोधा
घराच्या नूतनीकरणासाठी किंवा अचानक वैद्यकीय खर्चासाठी वैयक्तिक कर्जाची गरज भासू शकते.
बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी वैयक्तिक कर्जाच्या (Persoanl Loan) व्याजदरात बदल केले आहेत. वैयक्तिक कर्ज घेणे सोपे आहे कारण त्यासाठी सोने (Gold) आणि गृहकर्ज (Home loan) यांसारखे कोणतेही तारण किंवा सुरक्षा जमा करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय इतर कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज (Persoanl Loan) कोणत्याही कारणासाठी वापरले जाऊ शकते.
हेही वाचा: वेळेत कर्ज न भरल्यानं तुमचा CIBIL Score खराब झालाय?
घराच्या नूतनीकरणासाठी किंवा अचानक वैद्यकीय खर्चासाठी वैयक्तिक कर्जाची गरज भासू शकते, आर्थिक संकटाच्या काळात, तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसताना हा एक चांगला पर्याय बनतो. तुम्ही पहिल्यांदाच वैयक्तिक कर्ज (Persoanl Loan) घेणार असाल तर, तेव्हा या पाच गोष्टी लक्षात ठेवा.
परतफेड करता येईल तेवढे कर्ज घ्या :
परतफेडीच्या (Repayment) क्षमतेवर आधारित पूर्व-मंजूर कर्ज देखील बँका (Bank) देतात. यासाठी कमी कागदपत्रे (Documents) आवश्यक आहेत, त्यामुळे ते आकर्षक दिसते. या आधारावर अधिक वैयक्तिक कर्ज घेऊ नका, इतकेच कर्ज घ्या, जे सहज फेडता येईल. कर्जाची रक्कम ठरवताना, EMI विचारात घ्या जेणेकरून ते आर्थिक उद्दिष्टांमध्ये अडथळा निर्माण करणार नाही.
हेही वाचा: जास्त व्याज न देता कर्ज फेडण्याच्या आहेत सात पद्धती
पेमेंट टर्म लक्षात ठेवा:
पेमेंट टर्म (Payment term) देखील लक्षात ठेवा. जर तुम्ही कर्ज परतफेडीचा (Debt repayment) कालावधी जास्त ठेवला तर अशा स्थितीत ईएमआय (EMI)कमी असेल, पण व्याज जास्त असेल.
सर्वात कमी व्याज दर निवडा:
वैयक्तिक कर्जाचे दर इतर कर्जांच्या तुलनेत जास्त आहेत, कारण त्यात जास्त जोखीम असते. त्याचा दर 9 टक्के ते 24 टक्क्यांपर्यंत आहे. व्याजदर जितका जास्त असेल तितका भरावा लागणारा EMI जास्त असेल. त्यामुळे तिथून सर्वात कमी व्याजदर असलेले वैयक्तिक कर्ज (Persoanl Loan) घ्या.
या अटी देखील जाणून घ्या:
साधारणपणे 21 ते 65 वयोगटातील लोक वैयक्तिक कर्ज (Persoanl Loan) घेऊ शकतात. यासाठी किमान मासिक उत्पन्न 15,000 ते 30,000 रुपये दरम्यान असावे. कर्जदाराचा किमान कामाचा अनुभव सध्याच्या नोकरीमध्ये (Job) एक वर्षाचा किंवा एकूण दोन वर्षांचा असावा. जर तुमचा क्रेडिट स्कोर (Credit score) चांगला असेल तर तुम्हाला स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळेल. पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांसाठी व्याजदर वेगवेगळे आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  Explaining the Market Terms: Bull and Bear Markets
  July 2, 2022
  Save
  Explaining the Market Terms: Bull and Bear Markets
  H
  Hemant Malhotra
  Tata Capital Personal Loan
  March 2, 2021
  Save
  Tata Capital Personal Loan
  H
  Hemant Malhotra
  5 Common Credit Card Problems & How To Fix Them
  January 19, 2021
  Save
  5 Common Credit Card Problems & How To Fix Them
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.