लोन ऍपला बळी पडू नका, फसवणूक झाल्यास कळवा – Dainik Prabhat

B

पोलीस आयुक्तांनी ट्विटरद्वारे साधला पुणेकरांशी संवाद, समस्यांवरही भाष्य
पोलीस आयुक्तांना विचारलेले प्रश्‍न आणि दिलेली उत्तरे (ठराविक प्रश्‍न)

पुणे – लोन ऍपला बळी पडू नका, फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांना कळवा. पोलिसांकडून गैरवर्तन आणि अपशब्द वापरले गेल्यास काही न बोलता थेट मला मेसेज करा. नियम पाळण्याची सुरुवात आपल्यापासून होते, यासह विविध प्रश्‍नांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उत्तरे देत नागरिकांच्या समाधान केले. या उपक्रमाला पुणेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ट्विटरच्या माध्यमातून बुधवारी (दि. 21) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांच्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी त्यांना तब्बल सव्वातीनशे प्रश्‍न विचारण्यात आले. तर 500 हून अधिक नागरिकांनी ट्विट केले. नागरिकांनी पुण्यातील वाहतूक, सायबर गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, गुटखा, लोन ऍप खंडणी, गणेशोत्सवातील मिरवणूक अशा विषयांवर प्रश्‍न विचारले.
चायनिज लोन ऍपवर कारवाई केली जाते का?
* लोन ऍप फसवणूक ही मोठी समस्या असून, त्याला बळी पडू नका. तसे घडल्यास तक्रार द्यायला संकोच बाळगू नका. त्यासाठी आमची सायबर पोलिसांची स्वतंत्र टीम काम करत असल्यामुळे लवकरच त्याचे परिणाम मिळतील.
* गुटख्यावर कारवाई का होत नाही? यंत्रणा काय हप्त्यावर चालते का?
माझ्या मोबाइल क्रमांकावर थेट मेसेज करा. त्याची दखल घेऊन चौकशीअंती कडक कारवाई केली जाईल.
* गैरवर्तन करणाऱ्या व अपशब्द वापरणाऱ्या पोलिसांशी कसे वागावे ?
असे प्रकार घडले तर काय्दा हातात घेऊ नका. संबंधितांशी न बोलता वरिष्ठांना कळवा. तसेच तुम्ही मला थेट मेसेज करू शकता.
* पुणे पोलीस हेल्मेट घालत नाहीत, पण ते नागरिकांना हेल्मेट घालायला सांगतात. हा अन्याय नाही का ?
तुमच्या मताशी मी सहमत आहे. नियम पाळण्याची सुरूवात आपल्या घरापासून होते.
* सर आपल्याला वाटत नाही का, की शहरातील नव्या वाहनांची नोंदणी थांबवली पाहिजे ?
मान्य आहे. पुणे शहरात वाहनांच्या संख्येने 2018 मध्ये लोकसंख्येला देखील मागे टाकले. पण या समस्येकडे सर्वांगीन दृष्टीकोनातून पाहण्याची आता गरज आहे.
ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  How To Select The Right Bank Personal Loan
  March 18, 2021
  Save
  How To Select The Right Bank Personal Loan
  H
  Hemant Malhotra
  Top 10 Fintech for Low Income Personal Loan in India for 2021
  March 10, 2021
  Save
  Top 10 Fintech for Low Income Personal Loan in India for 2021
  H
  Hemant Malhotra
  How To Qualify For A Personal Loan (Without Putting Up Security).
  April 9, 2021
  Save
  How To Qualify For A Personal Loan (Without Putting Up Security).
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.