स्मार्टफोनच्या एका क्लिकवर मिनिटात मिळेल कर्ज, इंस्टंट लोन आणि अॅप्स संबंधी जाणून घ्या – Maharashtra Times

B

इंस्टंट लोन हवे असल्यास स्मार्टकॉइन (SmartCoin) हे अ‍ॅप तुम्हाला खूपच उपयोगी येईल. या अ‍ॅपचा उपयोग करून तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. अ‍ॅपद्वारे अ‍ॅप्लिकेशन भरल्यावर तुम्हाला काही मिनिटातच कर्ज मिळेल. यासाठी तुम्हाला एक ओळखपत्र, सेल्फी, कर्जाची रक्कम व बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत पर्सनल लोन मिळेल. तुम्हाला जर कोणत्याही कामासाठी कर्ज हवे असल्यास तुम्ही हे अ‍ॅप वापरू शकता.

वाचा- खूपच शानदार आहे ‘हा’ कूलर, AC प्रमाणे भिंतीवरही टांगता येईल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
इंस्टंट लोनसाठी कॅपिटल फर्स्टसाठी (Capital First) हे देखील एक चांगले अ‍ॅप आहे. कॅपिटल फर्स्ट अ‍ॅपमुळे तुमची कर्जाची चिंता एकाच ठिकाणी दूर होईल. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही मिनिटात कर्जासाठी अर्ज करू शकता. याद्वारे तुम्हाला पर्सनल, बिझनेस आणि कार लोनसाठी अर्ज करू शकता. तसेच, तुम्हाला अ‍ॅपमध्ये कर्जाशी संबंधित सर्व माहिती मिळेल. कॅपिटल फर्स्ट हे अ‍ॅप यूजर्सला नॉटिफिकेशनच्या माध्यमातून पर्सनल लोन ऑफर्सची माहिती देते.

वाचा: वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज! ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो Jio चा ‘हा’ धमाकेदार प्लान, ९१२GB डेटासह Disney+ Hotstar फ्री

तुम्हाला अगदी कमी कालावधीसाठी कर्ज हवे असल्यास कॅशे (CASHe) हे अ‍ॅप एक चांगला पर्याय आहे. कॅशे (CASHe) अ‍ॅप १५ दिवसांच्या कालावधीसाठी इंस्टंट लोन प्रदान करते. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला १० हजार ते २० हजार रुपयांपर्यंत त्वरित कर्ज मिळेल. नोकरदार वर्गासाठी हे अ‍ॅप चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे कर्जासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रं देखील द्यावी लागत नाही. यूजर्सला केवळ पॅन कार्ड नंबर, एड्रेस प्रूफ, लेटेस्ट सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट आणि सेल्फी इत्यादी माहिती द्यावी लागेल.

वाचा: धमाकेदार फीचर्ससह BoAt चे नवीन इयरबड्स भारतात लाँच, ५ मिनिटांच्या चार्जमध्ये १ तास ऐकू शकता गाणी; जाणून घ्या किंमत

क्रेडिटबी (KreditBee) हे इंस्टंट लोन अ‍ॅप आहे. तुम्हाला कर्ज म्हणून जास्त पैसे हवे असल्यास या अ‍ॅपचा वापर करू शकता. मात्र, कर्जासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लांबलचक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरून द्यावा लागेल. तुम्हाला अ‍ॅप्लिकेशनमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर खासगी माहिती द्यावी लागेल. KreditBee च्या माध्यमातून तुम्ही २ हजार रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. कर्जाची सर्व प्रक्रिया ऑनलाइनच पार पडते.

वाचा: १० हजारांच्या बजेटमध्ये धुमाकूळ घालायला येतोय ‘हा’ दमदार स्मार्टफोन, १५ एप्रिलला भारतात करणार एंट्री

एमपॉकेट (mPokket) हे एक इंस्टंट लोन अ‍ॅप आहे. याद्वारे तुम्हाला ५०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित उपलब्ध होते. अ‍ॅपद्वारे कर्जाची रक्कम टप्प्या टप्प्याने देखील घेऊ शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून एकाच दिवशी तुम्ही कमी रक्कमेचे वेगवेगळे कर्ज घेऊ शकता. mPokket हे विद्यार्थ्यांना देखील कर्ज देते. mPokket या अ‍ॅपची सुरुवात २०१६ साली झाली आहे. तसेच, अ‍ॅपला प्ले स्टोरवर ४ स्टार रेटिंग देखील मिळाले आहे.

वाचा: वारंवार चार्जिंगची गरज नाही! २८ तासांच्या बॅटरी लाईफसह Oppo चे शानदार इयरबड्स भारतात लाँच, किंमत खूपच कमी

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  S
  Siddhi Rajput
  How to Activate Net Banking In ICICI Bank
  December 29, 2021
  Save
  How to Activate Net Banking In ICICI Bank
  H
  Hemant Malhotra
  5 Points To Know About Secured & Unsecured Loan
  April 12, 2021
  Save
  5 Points To Know About Secured & Unsecured Loan
  H
  Hemant Malhotra
  How to reduce EMI on Personal Loan
  February 22, 2021
  Save
  How to reduce EMI on Personal Loan
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.