By: दीपक पळसुले, एबीपी माझा | Updated at : 27 Mar 2022 07:16 PM (IST)
Edited By: अश्वजीत जगताप
Mutual Funds
Midcap Mutual Funds: मिडकॅप विभागात गुंतवणुकीचे अधिक पर्याय आहेत, ज्यामुळे हे पर्याय किरकोळ गुंतवणूकदा निवड करत असतात. कारण लार्ज कॅप शेअर्स पेक्षा मिडकॅप समभागांमध्ये जोखीम जास्त असते. पण जर तुम्हाला जोखीम टाळायची असेल, तर थेट इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी तुम्ही मिडकॅप म्युच्युअल फंड कडे वळू शकता.
मिडकॅप फंडाचा रिटर्न चार्ट पाहता, गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधीतमधून मोठा नफा कमावला आहे. गेल्या 10 वर्षांच्या रिटर्न चार्टबद्दल बोलायचे झाल्यास, या कालावधीत वेगवेगळ्या फंडांनी 20% CAGR सह परतावा दिला आहे. येथील गुंतवणूकदारांचा पैसा 10 वर्षात 6 पटीने वाढला आहे. जे एसआयपीद्वारे गुंतवणूक करतात त्यांच्याकडे एक चांगला विशेष निधीही तयार असतो. येथे आम्ही केवळ कामगिरीच्या आधारे सर्वोत्तम 5 म्युच्युअल फंड योजनांची माहिती दिली आहे.
ही योजना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे की नाही ते तपासा.
अॅक्सिस मिडकॅप फंड (Axis Midcap Fund)
10 वर्षात परतावा: 20% CAGR
10 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य: 6.23 लाख रुपये
10 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 16 लाख रुपये
किमान एकरकमी गुंतवणूक: रु 5000
किमान SIP: रु 500
लाँच तारीख: फेब्रुवारी 18, 2011
लाँच झाल्यापासून परतावा: 18.30%
एकूण मालमत्ता: 16,518 कोटी (फेब्रुवारी 28, 2022)
खर्चाचे प्रमाण: 1.84% (31 जानेवारी 2022)
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड (Kotak Emerging Equity Fund)
10 वर्षात परतावा: 19.72% CAGR
10 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य: 6 लाख रुपये
10 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: रु. 16.5 लाख
किमान एकरकमी गुंतवणूक: रु 5000
किमान SIP: रु 1000
लाँच तारीख: मार्च 30, 2007
लाँच झाल्यापासून परतावा: 13.67%
एकूण मालमत्ता: 17,380 कोटी (फेब्रुवारी 28, 2022)
खर्चाचे प्रमाण: 1.80% (31 जानेवारी, 2022)
एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड (SBI Magnum Midcap Fund)
10 वर्षांत परतावा: 19.50% CAGR
10 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचं मूल्य: 6 लाख रुपये
10 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 15.5 लाख रुपये
किमान एकरकमी गुंतवणूक: रु 5000
किमान SIP: रु 500
लाँच तारीख: मार्च 29, 2005
लाँच झाल्यापासून परतावा: 16.37%
एकूण मालमत्ता: 6591 कोटी (फेब्रुवारी २८, २०२२)
खर्चाचे प्रमाण: 1.95% (31 जानेवारी २०२२)
UTI मिड कॅप फंड (UTI Mid Cap Fund)
10 वर्षात परतावा: 19% CAGR
10 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य: 5.79 लाख रुपये
10 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 15 लाख रुपये
किमान एकरकमी गुंतवणूक: रु 5000
किमान SIP: रु 500
लाँच तारीख: एप्रिल 7, 2007
लाँच झाल्यापासून परतावा: 17.83%
एकूण मालमत्ता: 6441 कोटी (फेब्रुवारी 28, 2022)
खर्चाचे प्रमाण: 1.81% (31 जानेवारी 2022)
इन्वेस्को इंडिया मिड कॅप फंड (Invesco India Mid Cap Fund)
10 वर्षांत परतावा: 19% CAGR
10 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य: 5.71 लाख रुपये
10 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 15 लाख रुपये
किमान एकरकमी गुंतवणूक: रु 1000
किमान SIP: रु 500
लाँच तारीख: एप्रिल 19, 2007
लाँच झाल्यापासून परतावा: 15.11%
एकूण मालमत्ता: 2115 कोटी (फेब्रुवारी 28, 2022)
खर्चाचे प्रमाण: 2.22% (31 जानेवारी, 2022)
हे देखीला वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha