Investment in gold :सोनं स्वस्त होतय; सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात – TV9 Marathi

B

|
Sep 07, 2022 | 4:11 PM

सोन्याचा दर (Gold rates) 50 हजार रुपयांहून कमी झालाय. त्यामुळे सोनं खरेदी करावं का? की आणखीन दर कमी होणार आहेत, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेत (America) व्याज दरात वाढ होत असल्यानं अमेरिकन डॉलर सतत मजबूत होत आहे. मंदी आणि महागाईमुळे (inflation) गुंतवणूक सोन्याकडे वळणं अपेक्षित होती ती गुंतवणूक आता डॉलरकडे वळत आहे. त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे आणि डॉलरच्या तुलनेत सोनं कमजोर होत आहे. डॉलरमुळे सध्या सोन्याचे दर घसरत आहेत. याच कारणांमुळे जगभरातील बहुतांश गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंड्स सोनं विकत आहेत. जुलैच्या अखेरपर्यंत जगभरातील गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंड्सकडे एकूण 3 हजार 708 टन सोनं होतं. त्यात आता घट होऊन 3 हजार 663 टन एवढं सोनं राहिलं आहे.

व्याज दरवाढीचा परिणाम

अमेरिकेत व्याज दरात वाढ झाल्यानं डॉलर उसळलाय. डॉलर इंडेक्स 20 वर्षांच्या सर्वोच्च स्थरावर म्हणजेच 110 च्या जवळपास पोहोचलाय. वाढत असलेले डॉलरचे दरच सोन्याचे भाव पाडत आहेत. सध्या देशांतर्गत आणि परदेशी बाजारात सोन्याचे दर सहा आठवड्याच्या निचांकी स्तरावर पोहोचलेत. जागतिक बाजारात प्रति औस सोन्याचा दर 1,700 डॉलरच्या खाली घसरला आहे. देशांतर्गत बाजारातही MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार रुपयांच्या खाली आलाय.

जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही तोपर्यंत व्याज दरात वाढ होतच राहणार, अशी स्पष्ट माहिती अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं दिलीये. व्याज दरात वाढ झाल्यास डॉलरही मजबूत होणार. अमेरिकेत कर्ज महाग झाल्यानं जगभरातील इतर मध्यवर्ती बँकांनीही व्याज दरात वाढ सुरू केलीये. त्यामुळे त्या देशातील कर्ज महाग होऊन चलन मजबूत होणार आहे.

युरोपातील बँकाही व्याज दर वाढवणार

आता तर युरोपातील मध्यवर्ती बँकाही व्याज दरात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. असं झाल्यास डॉलरच्या तुलनेत युरो मजबूत होणार.त्यावेळी डॉलरकडे वळालेली गुंतवणूक पुन्हा सोन्यात वळू शकते त्यामुळे सोन्याच्या दराला सपोर्ट मिळू शकतो.

तज्ज्ञ काय म्हणतात?

या महिन्यातच युरोपातील मध्यवर्ती बँका व्याज दरात वाढू करू शकतात अशी माहिती तज्ज्ञांकडून प्राप्त होत आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. ईसीबीनं व्याज दरात वाढ केल्यास सोन्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, अशा परिस्थितीत डिसेंबरपर्यंत सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजेच पुन्हा एकदा सोन्याचा दर 52,500 रुपयांवर पोहचू शकतो,अशी माहिती केडिया अॅडवायझरीचे संचालक अजय केडिया यांनी दिलीये. मात्र सोन्याचे सध्याचे दर पाहून तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताल तर गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

हे सुद्धा वाचासोन्याचा दर (Gold rates) 50 हजार रुपयांहून कमी झालाय. त्यामुळे सोनं खरेदी करावं का? की आणखीन दर कमी होणार आहेत, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेत (America) व्याज दरात वाढ होत असल्यानं अमेरिकन डॉलर सतत मजबूत होत आहे. मंदी आणि महागाईमुळे (inflation) गुंतवणूक सोन्याकडे वळणं अपेक्षित होती ती गुंतवणूक आता डॉलरकडे वळत आहे. त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे आणि डॉलरच्या तुलनेत सोनं कमजोर होत आहे. डॉलरमुळे सध्या सोन्याचे दर घसरत आहेत. याच कारणांमुळे जगभरातील बहुतांश गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंड्स सोनं विकत आहेत. जुलैच्या अखेरपर्यंत जगभरातील गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंड्सकडे एकूण 3 हजार 708 टन सोनं होतं. त्यात आता घट होऊन 3 हजार 663 टन एवढं सोनं राहिलं आहे.
अमेरिकेत व्याज दरात वाढ झाल्यानं डॉलर उसळलाय. डॉलर इंडेक्स 20 वर्षांच्या सर्वोच्च स्थरावर म्हणजेच 110 च्या जवळपास पोहोचलाय. वाढत असलेले डॉलरचे दरच सोन्याचे भाव पाडत आहेत. सध्या देशांतर्गत आणि परदेशी बाजारात सोन्याचे दर सहा आठवड्याच्या निचांकी स्तरावर पोहोचलेत. जागतिक बाजारात प्रति औस सोन्याचा दर 1,700 डॉलरच्या खाली घसरला आहे. देशांतर्गत बाजारातही MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार रुपयांच्या खाली आलाय.
जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही तोपर्यंत व्याज दरात वाढ होतच राहणार, अशी स्पष्ट माहिती अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं दिलीये. व्याज दरात वाढ झाल्यास डॉलरही मजबूत होणार. अमेरिकेत कर्ज महाग झाल्यानं जगभरातील इतर मध्यवर्ती बँकांनीही व्याज दरात वाढ सुरू केलीये. त्यामुळे त्या देशातील कर्ज महाग होऊन चलन मजबूत होणार आहे.
आता तर युरोपातील मध्यवर्ती बँकाही व्याज दरात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. असं झाल्यास डॉलरच्या तुलनेत युरो मजबूत होणार.त्यावेळी डॉलरकडे वळालेली गुंतवणूक पुन्हा सोन्यात वळू शकते त्यामुळे सोन्याच्या दराला सपोर्ट मिळू शकतो.
या महिन्यातच युरोपातील मध्यवर्ती बँका व्याज दरात वाढू करू शकतात अशी माहिती तज्ज्ञांकडून प्राप्त होत आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. ईसीबीनं व्याज दरात वाढ केल्यास सोन्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, अशा परिस्थितीत डिसेंबरपर्यंत सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजेच पुन्हा एकदा सोन्याचा दर 52,500 रुपयांवर पोहचू शकतो,अशी माहिती केडिया अॅडवायझरीचे संचालक अजय केडिया यांनी दिलीये. मात्र सोन्याचे सध्याचे दर पाहून तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताल तर गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.

  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  Home Loans: Floating vs Fixed Rates Of Interest
  February 11, 2021
  Save
  Home Loans: Floating vs Fixed Rates Of Interest
  S
  Siddhi Rajput
  How to Trade in Crypto- Beginner’s Guide
  December 16, 2021
  Save
  How to Trade in Crypto- Beginner’s Guide
  H
  Hemant Malhotra
  5 Common Credit Card Problems & How To Fix Them
  January 19, 2021
  Save
  5 Common Credit Card Problems & How To Fix Them
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter