Investment Tips | दररोज करा 17 रुपयांची गुंतवणूक आणि व्हा करोडपती…पाहा कसे, आजच करा सुरुवात – Times Now Marathi

B

Best Investment Plan : नवी दिल्ली : तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी तुम्ही काय योजना आखल्या आहेत? आपण अद्याप कोणतेही आर्थिक नियोजन  (Financial Planning) केले नसल्यास, शक्य तितक्या लवकर त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी तुम्ही चांगल्या आर्थिक सल्लागाराचाही सल्लाही घेऊ शकता. या संदर्भात आम्ही तुम्हाला काही गोष्टी सुचवत आहोत. तुमच्या गरजेनुरुप, नियोजनानुसार, कुवतीनुसार तुम्ही याचा वापर करू शकता. गुंतवणुकीला (Investment)सुरुवात केली तरच फारच चांगले. म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून मागील काही वर्षात लोकप्रिय झाला आहे. म्युच्युअल फंडातील अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडात एसआयपीच्या (SIP) माध्यमातून गुंतवणूक केल्यास छोट्या रकमेतून मोठी रक्कम उभारता येते. मात्र तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की संपत्ती निर्मितीसाठी लवकरात लवकर आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते. याचबरोबर योग्य आर्थिक नियोजन करून त्यावर शिस्तबद्धपणे पावले महत्त्वाचे ठरते. (Invest daily Rs 17 & become crorepati, invest through SIP, check the details)
अधिक वाचा : Share Market Investment | उन्हाळा कडक आहे, मात्र यातही कमाईची संधी आहे…वीजेच्या मागणीमुळे कंपन्यांची कमाई, कोणत्या शेअरमध्ये करावी गुंतवणूक
तुम्ही रोज छोटी गुंतवणूक केलीत तरी त्यातून मोठी रक्कम उभी राहू शकते. छोट्या गुंतवणुकीद्वारे तुम्ही मोठी रक्कम कशी उभारू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  आपण दरमहा ५०० रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेत आहोत. जर तुम्ही दैनंदिन आधारावर बघितले तर ही रक्कम जवळपास फक्त 16.66 रुपये (17 रुपये)  आहे. दररोज 17 रुपयांची बचत करणे ही काही मोठी गोष्ट नाही.
सुरुवातीला तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. 500 रुपये प्रति महिना SIP सह, तुम्ही लाखो रुपयांची रक्कम उभारू शकता. तुम्ही आर्थिक स्वप्ने यातून पूर्ण होऊ शकतात. 500 रुपयांमधून 1 कोटी रुपयांचा निधी कसा तयार होऊ शकतो हे जाणून घेऊया? तुम्हाला म्युच्युअल फंडात दररोज 17 रुपये (प्रति महिना 500 रुपये) गुंतवावे लागतील. गेल्या काही वर्षांत चांगल्या म्युच्युअल फंडांनी 20 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे.
अधिक वाचा : Akshaya Tritiya | अक्षय तृतीयेला खरेदी करा फक्त 1 रुपयात सोने, जाणून घ्या काय आहे खरेदी करण्याची पद्धत?
यासाठी तुम्हाला दररोज 17 रुपये म्हणजेच एका महिन्यात 500 रुपये गुंतवावे लागतील. ही रक्कम 20 वर्षांसाठी जमा करून तुम्ही 1.2 लाख रुपये जमा करता. 20 वर्षांत, वार्षिक 15% परताव्यानुसार तुमची एकूण रक्कम 7 लाख 8 हजार रुपये होईल. मात्र जर हाच परतावा वार्षिक 20 टक्के इतका असला तर तुमची एकूण रक्कम 15.80 लाख रुपये होईल.
अधिक वाचा : Gold Investment | या अक्षय तृतियेला काय कराल? सोन्यातील गुंतवणकीचे किती आहेत पर्याय? जास्त लाभ मिळवण्यासाठी अशी करा गुंतवणूक…
तुम्ही दर महिन्याला 500 रुपये गुंतवल्यास, 30 वर्षांत तुमचे 1.8 लाख रुपये जमा होतात. आता तुम्हाला यावर 30 वर्षांसाठी 20 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर तुमची एकूण रक्कम 1.16 कोटी रुपये होईल. गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंडांवर चक्रवाढीचा लाभ मिळतो. यामध्ये दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. हेच कारण आहे की तुम्ही छोट्या गुंतवणुकीद्वारे मोठा निधी मिळण्याची अपेक्षा करू शकता.
बाजारात विविध म्युच्युअल फंड हाऊसच्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत. तुमचे उत्पन्न, वयोगट, जोखीम क्षमता, आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन तुम्ही योग्य त्या म्युच्युअल फंड योजनेची निवड करू शकता. इक्विटी म्युच्युअल फंडातून मोठी रक्कम उभी राहते. ही गुंतवणूक दीर्घकालावधीसाठी असते. इक्विटी म्युच्युअल फंडात अधिक जोखीम असते मात्र त्याचबरोबर अधिक परतावादेखील मिळतो. मात्र दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास ही जोखीम कमी होते आणि मोठी रक्कम उभारता येते.
(डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. कृपया कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्या.)

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  Tata Capital Personal Loan
  March 2, 2021
  Save
  Tata Capital Personal Loan
  S
  Siddhi Rajput
  Scope of Cryptocurrency in India
  December 11, 2021
  Save
  Scope of Cryptocurrency in India
  T
  Tanvi Kaushik
  Small Business Loans: A Boon for Women Entrepreneurs
  August 29, 2022
  Save
  Small Business Loans: A Boon for Women Entrepreneurs
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.