Mutual Funds: शेअर बाजार की म्युच्युअल फंडात गुंतवणूक?… कुठे मिळवाल फायदा, घाबरू नका… – Lokmat

B

Lokmat Business
Mutual Funds: शेअर बाजार की म्युच्युअल फंडात गुंतवणूक?… कुठे मिळवाल फायदा, घाबरू नका…
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:44 AM2022-08-12T10:44:51+5:302022-08-12T10:45:56+5:30

शेअर बाजार किंवा त्यातल्या गुंतवणुकीबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण असते. बाजारात पैसा कमावणारे बक्कळ लोक असतात, परंतू गमावलेले पण बरेच असतात. जे गमावतात ते दुसऱ्याना कधीच सांगत नाहीत, त्यात कमीपणा असतो. बाजारातील शेअर्सचे भाव कसे वर खाली जातात त्यामागे कोणती कारणे असतात याचा थांगपत्ता पटकन लागत नाही. पूर्वीपासून बँक, पोस्ट ऑफिस आणि सोने यासारख्या गुंतवणुकीला भारतीय लोक सरावले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यायची हे शास्त्रोक्तपणे शिकवणाऱ्या अभ्यासक्रमाची संख्यासुद्धा कमी आहे. अशावेळी लोकांना संपत्ती निर्मितीसाठी एक हक्काचा मित्र आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड.
Mutual Funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक कधी आणि कशासाठी करायची? निमित्त लागणार की आताच सुरु करणार…
म्युच्युअल फंडात पैसे कुणी गुंतवावेत?
शेअर बाजारात गुंतवणूक करणारे कोणत्यातरी मित्राच्या सांगण्यावरून किंवा ऑफिसमधल्या कुणाच्या सांगण्यावरून, नाहीतर स्वतः वाचन वगैरे करून गुंतवतात. यात चूक काहीच नाही! पण बाजाराचे तंत्र आणि मंत्र उमगणे हे अशक्यच! एवढ्या वेगवेगळ्या घटना घडतात, त्याचा कुठल्या शेअरवर कसा, कधी, किती परिणाम होईल हे सांगता येणे अशक्य आहे. एखादेवेळी गुंतवणूक केलेली असते, शेअरचा भाव अपेक्षेप्रमाणे वरवर जात असतो आणि अचानकच काहीतरी होतं आणि शेअर कोलमडते! पैसे बुडतात आणि त्या माणसाचा शेअर बाजारवरचा विश्वास उडतो.  कधी कधी लोक शेअर बाजारात दुसऱ्याच्या माध्यमातून गुंतवणूक करतात.  कुठल्यातरी नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे आपले पैसे देतात, पण त्याने नेमके कुठले शेअर आपल्यासाठी घेतले आहेत? हे आपल्याला माहिती असलेच असे नाही. हे फक्त विश्वासावर चालतं! हे कायदेशीरपणे योग्य आहे की नाही हा मुद्दा अजूनच वेगळा, पण दुसऱ्याच्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आपले पैसे बुडावे हे किती वाईट.
याउलट म्युच्युअल फंड विश्‍वासार्ह
म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक नेमकी कुठे केली जाते याची संपूर्ण माहिती ती दर महिन्याच्या महिन्याला फंड हाऊसला त्यांच्या वेबसाइटवर दाखवावी लागते. प्रत्येक फंडाच्या प्रत्येक योजनेत कोणत्या शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये गुंतवणूक झाली आहे याचा तपशीलवार अहवाल प्रत्येक गुंतवणूकदाराला पाहायला मिळतो.
रोजच्या रोज म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेची नेट असेच व्हॅल्यु (NAV )संध्याकाळी जाहीर होते.  म्युच्युअल फंडातील फंड मॅनेजर स्वतःच्या मर्जीने पैसे गुंतवू शकत नाही. ते  कोणत्या प्रकारच्या शेअर्समध्ये किंवा सिक्युरिटीमध्ये गुंतवावेत याचे नियम घालून दिलेले असतात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीपेक्षा म्युच्युअल फंडातील व्यवहार अधिक विश्वासाचे ठरतात.
Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  Cost of Capital: How Businessmen and Investors utilize it to examine investments?
  December 28, 2020
  Save
  Cost of Capital: How Businessmen and Investors utilize it to examine investments?
  S
  Siddhi Rajput
  Crypto Banking and Decentralized Finance
  December 8, 2021
  Save
  Crypto Banking and Decentralized Finance
  H
  Hemant Malhotra
  What Is a No-Income Finance?
  February 12, 2021
  Save
  What Is a No-Income Finance?
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.