अजय देशपांडे |
Jul 16, 2022 | 8:10 AM
मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांच्या (Foreign investors) शेअर (shares) विक्रीमुळे भारतीय शेअर बाजाराचे पंख छाटले गेले आहेत. एप्रिलमध्ये निफ्टी (Nifty) 2 टक्के, मेमध्ये 2.6 टक्के आणि जूनमध्ये 4.7 टक्के घसरलाय. आता अर्थतज्ज्ञ आणि कॉर्पोरेट जगत मान्सूनच्या आशेवर अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची वाट पहात आहे . दुसरीकडे चालू जुलै महिन्यात बाजारात सुधारणा होईल या आशेवर गुंतवणूकदार आहेत. गेल्या 15 वर्षांत जुलैमध्ये सेन्सेक्स केवळ 4 वेळा घसरण होऊन बंद झाला. तसंच त्यामध्ये एकदाही 5 टक्क्यापेक्षा अधिक घसरण झाली नाही. 2019 मध्ये सेंसेक्समध्ये गेल्या 15 वर्षांती सर्वात जास्त म्हणजे 4.86 टक्के, जुलै 2011 मध्ये 3.4 टक्के, जुलै 2012 मध्ये 1.11 टक्के आणि जुलै 2013 मध्ये 0.26 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. यावरून असे दिसून येते की, मागील 15 वर्षांपैकी 11 वर्ष जुलै महिन्यात शेअबाजारातून सकारात्मक रिटर्न मिळाला आहे. त्यामुळे यंदाही महिना संपेपर्यंत सकारात्मक परतावा मिळेल अशी अशा शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना आहे.
गेल्या 15 वर्षांतील शेअर बाजाराच्या इतिहासावर नजर टाकल्यास जुलै महिन्यात सहा वेळा शेअर मार्केटमध्ये पाच टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. ज्यामध्ये जुलै 2009 मध्ये 8.12 टक्के, जुलै 2020 मध्ये 7.71 टक्के आणि जुलै 2008 मध्ये 6.64 टक्के रिटर्न मिळाला. या आकडेवारीमुळेच गुंतवणूकदारांच्या मनात यंदाही जुलै महिन्यात बाजारात तेजी येईल अशी अशा आहे. मात्र यंदाच्या शेअर बाजारातील घडामोडींवर नजर टाकल्यास हे थोडेसे कठिण वाटते. वाढत असलेला रेपो रेट, महागाई, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेअर बाजारात घसरण सुरू आहे. त्यामुळे हा जुलै महिना गुंतवणुकदारांसाठी कसा असणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सगळयात मोठी अडचण आहे, ती म्हणजे अमेरिकेतील वाढते व्याज दर. वाढत्या व्याज दरामुळे परदेशी गुंतवणूदार जोखीम असलेल्या बाजारातून गुंतवणूक काढून घेऊन सुरक्षित असणाऱ्या बॉण्डमध्ये करत आहेत. सध्या एक ते दोन वर्ष बॉण्डचे दर खाली येण्याची शक्यता कमी आहे. शेअर बाजारासाठी हा मोठा धोका आहे. यासोबतच वाढती महागाई, मागणीतील घट आणि रशिया- यूक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आता देशांतर्गत गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. आतापर्यंत म्युच्युअल फंड बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होती, मात्र आता या खरेदीला देखील ब्रेक लागला आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत काही दिलासादायक बातम्यांमुळे आशेचा किरण वाढलाय. वाढती महागाई रोखण्यासाठी अमेरिका, चीनी उत्पादनांवर वाढवण्यात आलेले शुल्क मागे घेऊ शकते किंवा कमी करू शकते. असं घडल्यास जगभरातील शेअर बाजारात गतीनं सुधारणा होऊ शकते. त्याचा सकारात्मक परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682