Investment Tips : FD मध्ये गुंतवणूक करताय? मग 'या' गोष्टी जाणून घ्या, होईल फायदा – ABP Majha

B

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Apr 2022 05:08 PM (IST)
Edited By: श्रीकांत भोसले
Investment Tips : FD मध्ये गुंतवणूक करताय? मग ‘या’ गोष्टी जाणून घ्या, होईल फायदा
Bank Fixed Deposit : अनेकजण आपल्याकडील बचतीचे पैसे कोणत्याही जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवण्याऐवजी जोखीममुक्त योजनांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. आजही देशात बँकेत मुदत ठेवीमध्ये (FD)गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. वेगवेगळ्या बँकांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीचे FD आहेत.
मागील काही महिन्यांत, SBI, Axis Bank, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा इत्यादी अनेक बँकांनी त्यांच्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही देखील बँकेच्या FD म्हणजेच, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्ही वेळेआधीच FD मोडल्यास तुम्हाला कमीत कमी नुकसान होईल. 
एफडी लॅडरिंग हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही एकूण 5 लाख रुपयांची एफडी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या पाच एफडी कराव्या लागणार आहेत. यामुळे, आपत्कालीन परिस्थितीत मुदत ठेव (FD) मोडताना तुम्हाला त्रास होणार नाही.
यामुळे, जर तुम्हाला मुदतीपूर्वी 2 लाख रुपयांची अचानक गरज भासली, तर तुम्ही फक्त दोनच एफडी मोडाल आणि तुम्हाला उर्वरित तीन एफडीवर पूर्ण व्याजाचा लाभ मिळेल. यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे गुंतवताना विविध प्रकारचे अतिरिक्त फायदेही मिळतील.

तुम्ही 10 लाख रुपयांसारख्या मोठ्या रकमेची एकाचवेळी FD केल्यास तुम्हाला 30 टक्के टॅक्स स्लॅबनुसार कर सवलत मिळेल. यामुळे तुम्हाला व्याजावर जास्त नफा मिळणार नाही. त्यामुळे अल्प रकमेत कमी व्याजदर मिळाले तरी कमी कर भरावा लागेल आणि आपत्कालीन परिस्थितीत कमी तोटा होईल.
जर तुम्ही बँकेत दीर्घ कालावधीसाठी FD ची योजना करत असाल, तर अशा परिस्थितीत तुम्ही बँकेच्या विशेष योजना जसे की 444 दिवस, 659 दिवस, 888 दिवस इत्यादींमध्ये गुंतवणूक करून अधिक फायदे मिळवू शकता. यामध्ये अनेक वेळा तुम्हाला जास्त व्याज दरासारखे अतिरिक्त फायदे मिळतात.
जर तुम्हाला एफडीवर जास्त परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही मोठ्या बँकांऐवजी स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी करू शकता. मोठ्या बँकांपेक्षा लहान फायनान्स बँका जास्त व्याजदर देतात. यासोबतच ग्राहकांना अतिरिक्त विमा संरक्षणाची सुविधाही मिळते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
 
मुंबईत ऑगस्ट महिन्यात घरांच्या विक्रीत 20 टक्क्यांची वाढ, तब्बल आठ हजार घरांची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या महसुलात 74 टक्क्यांची वाढ
Bajaj Finance Share : बजाज फायनान्सने FD वर व्याजदर वाढवला, आता 7.50 टक्के परतावा मिळणार 
PPF Withdrawal Rules: मुदतीआधीच पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता? जाणून घ्या नियम
Credit Card Benefits:  क्रेडिट कार्डचे ‘हे’ फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
LICHF: एलआयसी हाउसिंग फायनान्सचा ग्राहकांना झटका; गृह कर्ज महागले 
Maharashtra Rain : आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
Last Rites Of Cyrus Mistry : टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
शिक्षक दिनी पंतप्रधानांची मोठी घोषणा; PM-SHRI योजनेंतर्गत 14 हजार 500 शाळा अपग्रेड होणार
Horoscope Today, September 6, 2022 : मेष, सिंहसह ‘या’ राशींसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी!  जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Rohit Shetty Meet Amit Shah : दिग्दर्शक रोहित शेट्टीनं घेतली अमित शाह यांची भेट; पोस्ट शेअर करत म्हणाला…

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  How to change Name in Indian bank Account?
  April 18, 2021
  Save
  How to change Name in Indian bank Account?
  H
  Hemant Malhotra
  9 Ways to Guarantee Your credit card Online Transactions Are Safe
  December 21, 2020
  Save
  9 Ways to Guarantee Your credit card Online Transactions Are Safe
  H
  Hemant Malhotra
  Home Loans: Floating vs Fixed Rates Of Interest
  February 11, 2021
  Save
  Home Loans: Floating vs Fixed Rates Of Interest
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.